satyaupasak

“जंगलात गाडी, गाडीत मोठं गुपीत; 52 किलो सोनं आणि 10 कोटींची रोख रक्कम जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये आयकर विभागाने छापा टाकून मोठी संपत्ती आणि सोनं जप्त केलं आहे. भोपाळजवळील मंडोरे जंगलात एक लावारिस गाडी असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती.

“भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठा ऐवज हाती लागला असून सोन्याच्या (Gold) विटांसह मोठी रोख रक्कम आयकर विभागाने हस्तगत केली आहे. येथील जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेनं भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जंगलातील एका घराजवळ लावारिस अवस्थेत आढळलेल्या गाडीत एवढी संपत्ती सापडली आहे. त्या गाडीतून आढळलेल्या सोन्याची एकूण किंमत 40 कोटी 47 लाख रुपये आहे. आयकर विभागाचे (Income Tax) अधिकारी ही रक्कम आणि सोनं पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू असून या संपत्तीचा मालक कोण याचा शोध घेतला जात आहे.”

“मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये आयकर विभागाने छापा टाकून मोठी रक्कम आणि सोनं हस्तगत केलं आहे. भोपाळजवळील मंडोरे जंगलात एक लावारिस गाडी असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार, विभागाने जंगलातील गाडीवर छापा टाकताच मोठा ऐवज हाती लागला. त्या गाडीत मोठ्या प्रमाणात सोन्याच्या विटा आणि रोख रक्कम सापडली. तब्बल 52 किलो सोनं आणि 9.86 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळल्याने आयकर अधिकाऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत. इनोव्हा कंपनीच्या गाडीतून ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाने रात्रीच्या वेळेत छापा टाकून ही संपत्ती ताब्यात घेतली आहे.”

“आयकर विभागाच्या या मोहिमेत 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. लोकायुक्त आणि आयकर विभागाच्या संयुक्त कार्यवाहीत दोन दिवसांपासून ही छापेमारी सुरू होती. यापूर्वीही आयकर विभागाने भोपाळ आणि इंदौरच्या एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणी छापे मारले होते, ज्यामध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती. दरम्यान, मंडोरी जंगलातील कारवाईतही कंस्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, करचुकवेगिरी आणि बेकायदेशीर मार्गाने ही संपत्ती जमा करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी संबंधित मालमत्ता, कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या चौकशीनंतर अनेक रहस्ये उलगडतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं आणि रोख रक्कम कुठे पोहोचवली जाणार होती, याचाही तपास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *